एकनाथ शिंदे गटा इतक्याच जागा द्या....

मुंबई : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एकनाथ शिंदे गटाइतक्याच जागा अजित पवार गटाला द्यायला हव्यात असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. 


छगन भुजबळ म्हणाले, ते तुमचे (प्रसारमाध्यमांचे) फॉर्म्युले आहेत. त्यावर मी काय बोलणार? तो आमचा फॉर्म्युला नाही. आम्ही एवढंच सांगितले आहे की, महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायला हव्यात. शेवटी तिन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील. त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल.

परंतु, भुजबळांची मागणी व्यक्तीगत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post