नगर : आमदार नीलेश लंके यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. त्यांचे कोविड काळातील काम कौतुकास्पद आहे. या कामामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. ज्याच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असते, त्याला चिंता करण्याचे काही गरज नाही, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले.
आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'शिवपुत्र संभाजी महानाट्या'च्या व्यासपीठावर शुक्रवारी सायंकाळी भाजपचे माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थित महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार नीलेश लंके यांनी केडगाव येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन केले आहे. शुक्रवारी या महानाट्याचा दुसरा दिवस होता. भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, 'बीआरएस'चे घनश्याम शेलार,काँग्रेस'चे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळुके आदी उपस्थित होते.
या महानाट्याला जिल्हाभरातूननागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मानटेल आलेल्या नागरिकांची कोठेही गैरसोय झालेली दिसून आली नाही. त्यामुळे आमदार निलेश लंके यांचे सर्वांचे कौतुक होत होते.
Post a Comment