इंडिया आघाडीची आज सभा...

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग या माध्यमातून फुंकण्यात येईल. या सभेआधी राहुल गांधी यांची मुंबईत 'न्याय संकल्प' पदयात्रा होणार आहे. 


मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही 'न्याय संकल्प' पदयात्रा असणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत मोठ्या उत्साहात दाखल झाली. चैत्यभूमीवर या यात्रेची सांगता झाल्यानंतर ही सभा होणार आहे.

इंडिया आघाडीच्या या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन, आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडियाचे १५ हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post