श्रीगोंदा - उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांची निवड झाली असून नुकतेच निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाहाटा यांना दिले आहे.
त्याचबरोबर नुकताच कॉंग्रेस ला रामराम ठोकून अजित पवार गटात गेलेले नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष निवडीनंतर नाहाटा यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले नगर जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस व अजित दादांचे हात अधिक बळकट करण्यासाठी जिल्हाध्यक्ष या जबाबदारीने प्रभावीपणे काम करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले.

Post a Comment