भाजपात विद्यमान खासदार निवडणूक लढविण्यास इच्छूक नाहीत.... |

नवी दिल्ली : आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे जाऊन त्यांचे मनधरणी करीत आहेत. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्व निवडणुका हा प्रकार घडत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच दोन विद्यमान खासदारांनी आपण निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचे पत्र वरिष्ठांना दिले आहे.


गौतम गंभीरनंतर भाजपच्या अजून एका खासदाराने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. हजारी बागमधील भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे विनंती केली आहे. 

त्यांना सर्व निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी विनंती जयंत सिन्हा यांनी नड्डा यांच्याकडे केली आहे. दरम्यान आज सकाळी पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनीही आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय

आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं जयंत सिन्हा यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले. आपल्याला भारतात व जगभरातील जागतिक हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काम करायचे आहे. यामुळे पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी विनंती केल्याचे जयंत सिन्हा यांनी पोस्टद्वारे सांगितले. 

सिन्हा सध्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिन्हा यांच्या जागेवर आता कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post