नगर : जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) सुभाष दळवी यांचे नगर पुणे रोडवर कानेटिक चौकात टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत आज सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाला.त्यानंतर त्यांना नगर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दळवी यांचे (मूळ गाव तिखी, तालुका कर्जत) आहे. सध्या ते नगर कल्याण रोडवरील राहत होते. त्यांच्यामागे आई,पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जिल्हा परिषदेत हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment