लाचप्रकरणात अडकलेल्यांना जबाबदारीचे पदे... वरिष्ठांच्या कार्यपध्दतीवर संशय...

नगर :  लाचप्रकरणात सापडलेले व भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या कर्मचार्याला  जबाबदारीचे काम द्यायचे नाही. असा शासकीय नियम आहे. परंतु आता या दोन्ही प्रकरणाचे आरोप असणार्यांना जबाबदारीचे कामे देण्याचा प्रकार जिल्ह्यातील काही सरकारी कार्यालयांमध्ये सुरु आहे. यामध्ये  आर्थिक तडजोडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सरकारी कामात अनेकदा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होत असतात. त्यातील काही आरोप सिध्द होऊन संबंधितांवर कारवाई होते, तर काही निर्दोष सुटतात. काही वेळा गैरव्यवहाराचे आरोप लवकर सिध्द होत नाही. त्याची सुनावणी सुरु असते. त्या काळात संबंधिताला जबाबदारीचे पद देऊ नये, असा शासकीय नियम आहे. मात्र या नियमाचे शासकीय कार्यालयात उल्लंघन केले जात आहे.

लाचप्रकरणातील व्यक्तीलाही आर्थिक गोष्टींशी निगडीत असलेली जबाबदारीचे काम दिले जात नाही. परंतु जिल्हा परिषदेत दोन्ही प्रकरातील कर्मचाऱ्यांना मानाचे जबाबदारी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे त्या कर्मचाऱ्यांची पाठराख प्रशासनातील काही अधिकारी करीत असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शासकीय कार्यालयांना जसा नियम आहे. तसाच खासगी कार्यालयांच्या बाबतीतही नियम आहे. मात्र तो लिखीत नाही. परंतु खासगी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना वरिष्ठ जवळ ठेऊन वसुली करून घेत असल्याची चर्चा सुरु आहे.

हाच नियम खासगी कार्यालयांना लागू आहे.  परंतु या नियमाची खासगी कार्यालयात सर्रास केली जात आहे. रात्रीची जेवनाची व पिण्याची सोय केल्यानंतर त्यांना मानाची पदे दिली जात आहे. भ्रष्टाचाराचे आऱोप झालेल्यांना बरोबर घेऊन वरिष्ठ फिरवून आपणही त्या गोष्टीला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट करीत असल्याची चर्चा खासगी कार्यालयांमध्ये सुरु आहे.
हा प्रकार सरकारी व खासगी कार्यालयात सुरु असल्याने सर्वसामान्यावर अन्याय होत आहे. इमाने इतबारे काम करणारे कामचं करीत असून इतर मात्र त्यांचे पोट भरून घेत आहे. आपल्याच वाट्याला चांगला टेबल मिळल यासाठी काही जण वरिष्ठा खूश ठेवत आहेत.
यातून सर्वसामान्य कर्मचार्याचा मात्र बळी जात आहे. हाच प्रकार जिल्हा परिषदेतील एका विभागात घडला आहे. त्यातून काहींचे मोठे नुकसान झालेले आहे. हीच परिस्थिती काही खासगी कार्यालयात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्याचे नेहमीच वाजवादी बोत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post