नगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला १६५० ते २१०० रुपये भाव मिळाला.
लिलावासाठी एकूण ८८ हजार ३४८ गोण्या कांद्याची आवक झाली. आवक काहीशी वाढली असली तरी भाव पूर्वीप्रमाणे खाली आले आहेत.
यात प्रथम प्रतीच्या कांद्यास १६५० ते २१०० रुपये, द्वितीय प्रतीस १०५० ते १६५०, तृतीय प्रतीस ६५० ते १०५०, चतुर्थ प्रतीस १५० ते ६५० रुपये भाव मिळाला.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment