पेट्रोल व डिझेलच्या दरात घसरण....

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.  सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरांत प्रत्येकी दोन रुपयांची कपात केली. 


केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर याबाबत घोषणा केली. विशेष म्हणजे, दशकभरापूर्वीच पेट्रोल व डिझेलच्या दरांवरील नियंत्रण सोडल्यामुळे कंपन्यांकडूनच दरांची घोषणा केली जात होती. असे असताना गुरुवारी संध्याकाळी पुरी यांनी याबाबत माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकाभिमुख निर्णय घेत असल्याची स्तुतिसुमनेही उधळली. 

आज, शुक्रवारी सकाळपासून ही दरकपात अस्तित्वात आली आहे. गँस पाठोपाठ आता पेट्रोल व डिझेलच्या भावात घसरण झालेली आहे. ही दरवाढ कमी करून सरकारला काही फायदा होईल का याची सध्या चर्चा सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post