मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या नवीन किमती जाहिर झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज डब्लूटीआय क्रूड 0.37% च्या घसरणीसह प्रति बॅरल $ 83.16 वर विकले जाते आहे.
ब्रेंट क्रूड 0.14% च्या घसरणीसह प्रति बॅरल $87.26 वर व्यापार करत आहे. अशातच आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणाताही बदल झालेला नाही. मागच्या महिन्याच्या तुलनेत पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला आहे.
मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.५१ रुपये प्रति लिटर इतके आहे. छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६. ६२ रुपयांनी विक्री होत आहे. तर डिझेल ९३.३९ रुपये प्रति लिटरने मिळत आहे.
नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.६४ रुपये प्रति लिटरने विक्री होते. तर डिझेल ९१. १२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.
पुण्यात आज किमतीत किंचित बदल झालेला पाहायला मिळाली आहे. पेट्रोलच्या किंमती १०३.७६ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.३० रुपये इतका आहे.

Post a Comment