मुंबई : राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानाचा पारा 35 ते 37 अंशादरम्यान आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आता काही जिल्ह्यांमधून थंडी गायब झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत आहे. किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे.
राज्यात अवकाळीचं सावट कायम आहे. शेतकऱ्यांच्या अगदी तोंडचं पाणी पळालं आहे. आता नागपूर सह भंडारा-गोंदिया जिल्ह्याला पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील चार दिवसांत केरळ, माहे, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये उष्ण आणि दमट हवामान असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य भारतातील अनेक भागात वादळ, विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे.

Post a Comment