आमदार राम शिंदे यांचा विखेंना पाठिंबा.....

नगर : भाजपचे आमदार राम शिंदे यांनी अवघे दीड मिनिट भाषण करून डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची पूर्वतयारीची आढावा बैठक आज नगर येथे पार पडली.   


यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक विजय चौधरी, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे उमेदवार सुजय विखे, अभय आगरकर यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान या बैठकीला आमदार राम शिंदे उपस्थित राहतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राम शिंदे व सुजय विखे यांचे मनोमिलन झाले अशी चर्चा बैठक स्थळी होती. परंतु शिंदे शिंदे यांनी अवघी दीड मिनिट भाषण केल्यामुळे सभास्थळी वेगळी चर्चा सुरू झाली होती. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post