नगर : मी जर उमेदवार असतो, तर लंके मैदानात नसते, असे आमदार राम शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
शिंदे म्हणाले की, नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रदेशने केंद्रीय समितीला नावही सूचविलेले होते. केंद्रीय समितीही अनुकूल होती, असे ते म्हणाले.
तसेच आपण आमदार लंके यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या. याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, की महायुतीत असल्याने त्यांनी आयोजित केलेल्या
महानाट्याला भेट दिली होती. त्यांची व आपली मैत्री असून, मी जर उमेदवार असतो. तर ते मैदानात उतरले नसते, असे ते म्हणाले.
यावरून शिंदे नाराज असल्याचे वाटत आहे. भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची पूर्वतयारीची आढावा बैठक नगर येथे पार पडली. त्या बैठकीला राम शिंदे उपस्थित होते.
आमदार राम शिंदे यांनी अवघे दीड मिनिट भाषण करून डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा दिला. परंतु पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिलेली प्रतिक्रियेने खळबळ उडाली आहे.

Post a Comment