राहाता : कोणाला किती मोर्चे व आरोप करायचे ते करू द्या, या आरोपांना आपण दोन महिन्यांनी उत्तर देऊ,असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून राजकीय दृष्टिकोन ठेवून कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींना निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप भाजपचे विवेक कोल्हे यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी शुकवारी (ता.एक) शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लक्ष वेधले.
या मोर्चात विखे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी वेळपसंगी शिर्डीतून विधानसभेला उमेदवारी करणार असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील काय उत्तर देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
शिर्डीत निकरी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बच्चा गटाच्या लाभार्थ्यांना खासदार विले पाटील यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
विखे म्हणाले, सध्या तालुक्यात बऱ्याच 'मंथरा' फिरत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. तालुक्याचा सुसंस्कृतपणा सोडू नका, असा सल्ला देतानाच गावातील प्रत्येक कार्यकर्त्याने दहा कुटुंबीयांपर्यंत योजना पोहोचवून विरोधकांना कामातून उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी केले.
Post a Comment