विखे यांनी मागितली माफी....

नगर : यंदा निवडणुकीचा तिकीट मला जरी मिळाला असलं तरी गेला पाच वर्षाचा काळ हा खडतर काळ होता, कोणाच्या या पाच वर्षांमध्ये भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो असे म्हणत भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी आज भाजपाच्या बैठकीमध्ये तीन वेळेला पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची माफी मागितली. 


भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची पूर्वतयारीची आढावा बैठक आज नगर येथे पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक विजय चौधरी, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे उमेदवार सुजय विखे, अभय आगरकर यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तर दुसरीकडे या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व लोकसभेचे समन्वयक भानुदास बेरड यांनी या सभेकडे पाठ फिरवली. भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी अवघे दीड मिनिट भाषण करून विखेना पाठिंबा दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post