नगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागीय कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुभाष दळवी यांचे नगर पुणे रोडवर कानेटिक चौकात टेम्पो व दुचाकीच्या धडकेत अपघाती निधन झाले आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते परिचित होते. त्यांना श्रद्धांजली वाहून जिल्हा परिषदेचे एक दिवस कामकाज बंद ठेवावे अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामध्ये कामकाज करायला अनेक कर्मचारी धजावत नाही. बदली प्रक्रियेच्या वेळी ग्रामपंचायत सोडून इतर विभागात जाण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत असतात. परंतु कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुभाष दळवी दळवी यांनी ग्रामपंचायत विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून या विभागात काम करण्यासाठी काहीजण तयार झालेले आहेत.
अभ्यासू व अडचणींच्या काळात मदतीला धावून जाणारे व्यक्ती म्हणून दळवी यांची जिल्हा परिषदेत ओळख होती. त्यांच्या या गुणांमुळे ते सर्वांचे लाडके अधिकारी बनले होते. त्यांच्या कामाच्या पध्दतीमुळे त्यांच्यावर सर्व विभागातील अधिकार्याचा विश्वास होता.
दळवी यांनी काम करताना कधीही वेळेचे बंधन पाळले नाही. सदैव ते कामाला तत्परत असतं. आपले वरिष्ठ अधिकारी अधिकारी कामावर राहत असल्यामुळे सर्व कर्मचारी ही सुट्टीच्या दिवशीकाम करत असत. दळवी यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग म्हणजे आपले कुटुंब समजूनच कामकाज केले आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या या स्वभावामुळे जिल्हा परिषदेतील लाडके अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहून एक दिवस कामकाज बंद ठेवून अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment