नगर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिलकुमार रामदास पठारे यांची जालना येथे बदली झाली आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग यांच्या वाचा येथील निर्देशानुसार, महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक संवर्गातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिलकुमार रामदास पठारे यांची बदली झाली आहे.
जालना येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिलकुमार रामदास पठारे हजर होणार आहेत. त्यांना बदलीने पदस्थापनेचे आदेश शासनारतर्फे देण्यात येत आहे. जालना येथील प्रकल्प संचालकपद रिक्त होते. ती जागा भरली असून नगरची जागा रिक्त राहिली आहे. या जागी कोणाची नियुक्ती झालेली नाही.

Post a Comment