अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे....

नगर ः अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप सोडणार असून ही जागा आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली आहे. ही जागा भाजप सोडण्यास तयार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून देण्यात आली. 


राज्यात महायुतीमध्ये सध्या जागा वाटपाचा घोळ सुरु आहे. शिंदे व पवार गट जागांवर अडून बसलेला आहे. त्यामुळे जागा वाटप अद्याप झालेले नाही. हा जागा वाटपाचा घोळ एक ते दोन दिवसात सुटला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

राज्यातील राष्ट्रवादीच्या काही जागा भाजपाकडे तर भाजपाच्या काही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जागा भाजप सोडणार असल्याची चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. 

अहमदनगर लोकसभा मतदासंघाची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. तशी चर्चा आज महायुतीच्या नेत्यांच्या झालेल्या बैेठकीत झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटाकडे गेलेली आहे. त्यामुळे या जागेवर कोण उभे राहणार याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेली आहे. भाजपमध्ये सध्या खासदार सुजय विखे यांना मोठ्या प्रमाणात विरोध आहे. 

या विरोधात हातून एक जागा विरोधकांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने ही जागा आपला उमेदवार उभा करण्याऐवजी अजित पवार गटाला दिली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा जर अजित पवार गटाला मिळाली तर खासदार सुजय विखे काय करणार याविषयी सध्या नगर शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच अजित पवार गटाकडून कोण उमेदवार राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post