लालबरोबर गावरान कांद्याची आवक वाढली...

नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये लाल कांद्याच्या 45,549 गोण्यांची  तर गावरान कांद्याच्या 52705 कांदा गोण्यांची आवक झाली.  कांद्याची आवक चांगली झाली आहे. मात्र भाव मिळाला नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.


नेप्ती उपबाजार समितीत लाल व गावरान कांद्याची सुमारे एक लाख गोण्यांची आवक झाली. मात्र कांद्याला चांगला भाव मिळालेला नाही. आवक वाढल्याने कांद्याच्या भावावर परिणाम होत आहे. 

लाल कांदा बाजार भाव ः  एक नंबर कांद्याला ः    1300 ते 1700,  दोन नंबर कांद्याला ः  800 ते 1300 , तीन नंबर कांद्याला ः  400 ते 800 , तीन नंबर कांद्याला  ः  100 ते 400.

गावरान कांदा बाजार भाव : एक नंबर ः 1450 ते 1800,  दोन नंबर ः 950 ते 1450, तीन नंबर ः 550 ते 950, चार नंबर ः 150 ते 550.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post