पुणे ः राजकीय आयुष्यात एकूण १४ निवडणुका लढलो आणि जिंकले आहेत. परंतु पक्ष फुटीच्या घटना घडलेली आहे. जे पक्षातून बाहेर पडलेले आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी आता शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी कार्यकर्ते त्यांना पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे, असे असा आग्रह करीत आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातील मोदीबागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी लोकसभेचं जागावाटप, मतदारसंघांचे गणित, वेगवेगळी राजकीय समीकरणे, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आदी विषयांवर शरद पवार यांनी आपली मते मांडली.
मी लोकसभा निवडणूक लढवावी, असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. खास करून मला पुण्यातून लढण्याचा आग्रह होतोय. त्याचबरोबर सातारा आणि माढ्यातूनही कार्यकर्ते आग्रह करत आहेत. परंतु मी माझ्या राजकीय आयुष्यात एकूण १४ निवडणुका लढलो आणि जिंकलो, आणखी किती निवडणुका लढवणार…? असा प्रश्न उपस्थित करत तसेही मी यापूर्वीच आता लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलेली आहे, असे सांगायलाही शरद पवार विसरले नाहीत.
शरद पवार यांनी त्यांची भूमिका माध्यमांसमोर मांडलेली आहे. मात्र पक्ष संघटनाची ताकदी दाखवून देण्यासाठी आता शरद पवार यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून विरोधकांना नामोहरण करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ आहेत, तुम्ही थांबा म्हणणाऱ्यांना मतदार आपल्या पाठिशी आहेत, हे दाखवून देण्यासाठी शरद पवार यांनी 15 वी निवडणूक एकदा लढवून दाखवावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. तुम्ही फक्त अर्ज भरा बाकी प्रचाराचे आम्ही बघतो, असे कार्यकर्ते बोलत आहेत. त्यामुळे शरद पवार आता यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरोधकांमध्ये विशेष करून अजित पवार गटाला शरद पवार गटावर आरोप करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या प्रत्येक आरोपाला शरद पवार गटासह सर्वसामान्यांकडून प्रतिप्रश्न केला जाऊ शकतो. त्यामुळे अजित पवार गटाच्या मिळणाऱ्या जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येणे तेव्हढे सोपे राहिलेले नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Post a Comment