चांदा ः अलख निरंजन ,ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय ॥अशा जयघोषात सुमधुर तालातील डफांच्या निनादात चैतन्य कानिफनाथ मंदिरातील मानाच्या काठ्यांची [महाल] मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
त्यानुसार आज सायंकाळी सहा वाजता काठ्यांच्या [महाल] मिरवणुकीला सुरुवात झाली .फटाक्यांची आतिषबाजी डफांच्या तालावर विविध डाव खेळणारी युवक मंडळी आणि चैतन्य कानिफनाथांचा जयघोष करत मिरवणूक शनी मंदिर ,मारुती मंदिर मार्गे श्री सोमेश्वर मंदिर मार्गाने वाजत गाजत मार्गस्थ झाली.
यावेळी ठिकठिकाणी काठ्यांच्या मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले.. होळीपासून चैतन्य कानिफनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होत असतात .ते थेट गुढीपाडव्यापर्यंत चालतात .होळीची मिरवणूक झाल्यानंतर रंगपंचमीच्या आदल्या दिवशी सर्व चैतन्य कानिफनाथ भक्तगण मढी येथे मानाच्या काठीला [ महाल] घेऊन जातात.
त्या ठिकाणी षष्ठीच्या दिवशी चांद्याच्या कानिफनाथ मंदिराच्या काठीला मढी येथील देवस्थानमध्ये मोठा मान असतो. चांद्यातील कानिफनाथ भक्तांचा व मानाच्या काठीचा मढी देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात येतो. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला चांदा येथून शेकडो तरुण पैठणला जाऊन नाथसागरातून कावडीने पाणी घेऊन मढी येथे जातात. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याला चांदा येथील कानिफनाथ मंदिरात भव्य जलाभिषेक होऊन मंदिर दर्शनासाठी सर्वांसाठी खुले असते. संपूर्ण पंधरा दिवस कानिफनाथ भक्तांसाठी एक मोठी पर्वणीच या निमित्ताने असते.
Post a Comment