नगर ः रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या एका विद्यार्थीनीने भास्कर मोरे विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू होते. या आंदोलनाला मनसे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पक्ष यांच्या सह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.
कालपासून तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व विद्यार्थी उपोषणाला बसले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारी साठी महिला साहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी नियुक्ती केली होती. तरीही विद्यार्थी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलनावर ठाम होते. तेव्हा रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला मोरेवर गुन्हा दाखल झाला आहे.
आंदोलनकर्त्याशी चर्चा करण्यासाठी काल उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत वाखारे यांनी भेट दिली व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या. तसेच मुलींच्या तक्रारी साठी महिला साहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी नियुक्ती केली होती.
विद्यार्थी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाम होते. तेव्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या एका विद्यार्थीनीने भास्कर मोरे विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
त्यात म्हटले आहे की, भास्कर मोरे यांनी फिर्यादी यास कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलावून घेऊन सदर ऑफिसच्या अँटी चेंबर मध्ये फिर्यादीस लज्जा उपत्न होईल असे कृत्ये करतात. अश्लिल चाळे करतात. अशी फिर्याद एका कॉलेजच्या विद्यार्थिनीने दिली आहे.
त्यानुसार जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.
उपोषणकर्ते काही मुलींची प्रकृती खालवल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी होत आहे.
Post a Comment