नगर ः राजकारण कधीही कोणत्या वळणावर जाऊ शकते असे सूचक वक्तव्य आमदार नीलेश लंके यांनी केलेले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे आमदार निलेश लंके अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी ते शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता ते आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. राजकारण कधीही कोणत्या वळणावर जाऊ शकते असे सूचक वक्तव्य त्यांनी केलेले आहे.
Post a Comment