मुंबई ः लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे. आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आमदार नीलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाचे श्रेय हे खासदार अमोल कोल्हे व आमदार प्राजक्त तनपूरे यांना दिल्याने आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या उपस्थिती लंकेना जयंत पाटीलांनी पक्षाचं चिन्ह दिले, त्यावेळी रोहित पवार अनुपस्थित होते.
पुन्हा एकदा अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्या फळीतील नेते असा टोमणा मारला आहे. ‘नेता एकटा लढतोय. विरोधाची म्हणावी तशी धार नाही, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. या ट्विटवरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार यांच्या गटात पुन्हा फुट पडण्याची शक्यता आहे. आता कितीजण बाहेर पडणार व नवा पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार याविषयी चर्चा सुरु झालेली आहे.

Post a Comment