नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.
त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. शिर्डी व अहमदनगर मतदारसंघात चोथ्या टप्पात म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे
सात टप्प्यात मतदान ः पहिला टप्पा – 19 एप्रिल, दुसरा टप्पा – 26 एप्रिल, तिसरा टप्पा – 7 मे, चौथा टप्पा – 13 मे, पाचवा टप्पा – 20 मे, सहावा टप्पा – 25 मे, सातवा टप्पा – 1 जून.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे.

Post a Comment