नगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस तसेच शरद पवार, उध्दव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांच्याकडे पाहून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार नसून उमेदवार पाहून आता मतदान होणार आहे. उमेदवारांकडून किती मतदारसंघात विकास होऊ शकतो व ते काय आश्वासन देणार यावरच मतदारांचे भविष्य अवलंबून असले तरी या मतदारसंघातील आजी व माजी आमदारांच्या हाती उमेदवारांचे भविष्य आहे. ते ठरवितील तोच येथे खासदार होणार आहे..
राज्यात लोकसभा मतदारसंघापेक्षा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. मागील निवडणूक अटीतटीची झाली झाली असती परंतु काहींनी विरोधकांशी हात मिळवणी झाल्याचा आरोप आता होत आहे. त्यात तथ्य किती हे आरोप करणाऱ्यांनाच माहिती आहे. परंतु या पंचावार्षिकची निवडणूक मात्र चांगलीच चुरशीची होणार आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघातील लढत तशी काट्याची होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरवात केलेली आहे. तसेच दोन्ही उमेदवारांनी बैठका घेण्यास सुरवात केलेली आहे. या बैठकांमध्ये विरोधी गटाच्या उमेदवरांवर आऱोप केले जात आहे. या आरोपींनी आता चांगलेच वातावरण तापलेले आहे. एकमेकांवर केलेल्या आरोपींना प्रतिउत्तर गमतीशीर मिळत आहे.
दोन्ही उमेदवारांकडून प्रचार सुरु असला तरी याच मतदार संघातील एक माजी आमदार व एक आजी आमदार यांच्या भोवतीच ही निवडणूक फिरत आहे. या दोघांची ज्या उमेदवाराला मदत होईल, तोच उमेदवार या निवडणुकीत विजयी होणार आहे. आजी आमदाराकडे दोन तालुक्यांची ताकद असून माजी आमदाराकडे दोन मतदारसंघाची ताकद आहे.
या ताकदीवरच ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवराचे भविष्य ठरविणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून जपले जात असून रोज त्यांच्याशी संपर्क केला जात असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. हेच आजी-माजी आमदार खासदारांचे भविष्य ठरविणार आहे.
सध्या महायुती व महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यातील काही आमदार महायुतीच्या खासदारावर तर काही आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवारावर नाराज आहेत. या आमदारांची नाराजी कितीही असली तरी त्या दोन नेत्यांची मदत महत्वपूर्ण या निवडणुकीत ठरणार आहे. ही मदत ऐनवेळी पार्टी बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धास्ती वाढलेली असून या आजी-माजी आमदारांच्या संपर्कात राहण्याशिवाय उमेदवारांना पर्याय राहिलेला नाही.
Post a Comment