नगर ः जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सध्या नियमबाह्य कामे सुरु आहेत. या कामांमुळे सध्या इमाने इतबारे कामे करणारे शिक्षकांवर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आता शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या पदोन्नतींची फेरचौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मे महिन्यात जिल्ह्यातील काही शाळांमधील शिक्षकांसह मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक सेवानिवृत्त होत आहे. वरिष्ठ सेवानिवृत्त झाल्यानंतर कनिष्ठांना पदोन्नती देण्यात येत असते. मात्र सध्या माध्यमिक शिक्षण विभागात सर्वच ठिकाणी सावळागोंधळ सुरु आहे. हा गोंधळ होण्यास माध्यमिक शिक्षण संस्था जबाबदार आहेत. नियमबाह्य पध्दतीने सध्या संस्था कामे करीत आहेत. विशेष म्हणजे संस्था चालकांना नियमबाह्य कामे करण्यास काही शिक्षक परावृत्त करीत आहेत.
त्यासाठी काहीजण संस्था चालक व इतरांना जेवणावळीपासून त्यांच्या सर्वच इच्छा पूर्ण करीत आहेत. यामध्ये आर्थिक गणितेही होत असल्याची जिल्ह्यात सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे नियमानुुसार ज्यांना पदोन्नती द्यायला हवी त्यांना पदोन्नती दिली जात नाही. त्यामुळे नियमाने कामे करणाऱ्यांवर अन्याय होत आहे.
हा अन्याय जिल्ह्यातील काही संस्थांमधील शिक्षकांवर झालेला स्थानिक सह राजकीय दबाव तंत्राचा वापर करून असी कामे केली जात आहे. याबाबत काही सामाजिक संघटनांनी आवाज उठविण्यास सुरवात केलेली आहे. याबाबत आता शिक्षण विभागासह काही संस्थांमधून माहिती अधिकारामध्ये माहिती मागविण्यास सुरवात केलेली आहे. या माहितीच्या आधारेच आता काही बाबी उघड होत आहे.
जी नियमबाह्य कामे झालेली आहेत. ती सर्व नियमात करून संबंधितांना न्याय द्यावा, अन्यथा शाळांची तक्रार थेट शिक्षण मंत्र्यांकडे पुराव्यानिशी करण्यात येईल, असा इशारा सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्हयातील काही शाळांमधील मुख्यापकासह उपमुख्यध्यापक व पर्यवेक्षक पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाते. मात्र काही शाळांमध्ये नियम धाब्यावर बसविण्यात येत आहे. काही शिक्षक संस्थाचालकांना खूश ठेऊन शिक्षकांवर दबाव आणत आहेत. त्यातून नियमबाह्य पध्दतीने पदोन्नती दिली जात आहे. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रभारी मुख्याध्यापक पदी पदोन्नती देतानाही नियम आहेत. जे मुख्याध्यापक पदासाठी नियम आहेत. तेच नियम प्रभारी मुख्याध्यापक पदासाठी आहेत. मात्र जिल्ह्यातील काही संस्था नियमबाह्य पध्दतीने कामकाज करून शिक्षकांवर अन्याय करीत आहेत. याबाबत आता थेट शिक्षणमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात येणार असल्याचे सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
प्रस्तावाला सेवा ज्येष्ठता यादी नाहीपदोन्नती देण्यासाठी काही संस्थांनी नियमबाह्य कामे सुरु केलेले आहे. सेवा ज्येष्ठता यादी न देताच काही संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहे. या प्रस्तावावर बिदागी ठेऊन गैरमार्गाने मंजूर करण्याचा प्रकार शिक्षण विभागात सुरु असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. या चर्चेला आता अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सत्यता पडताळून पूर्णविराम देणे गरजेचे आहे.
- दाद मागता येते...
- नियमबाह्य पध्दतीने एखाद्याला पदोन्नती दिली असेल तर अन्याय झालेल्या शिक्षकांनी याबाबत शिक्षणार्यांकडे तक्रार करणे अपेक्षीत आहे. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन निकाल दिला जातो. यासाठी संबंधित शिक्षकाने आपल्याकडे सेवाज्येष्ठता यादीसह इतर पुरावे जवळ ठेवणे गरजेचे आहे. त्यातूनच अशा शिक्षकांना न्याय मिळतो.

Post a Comment