पाथर्डी : लोकांचे प्रश्न सोडविता सोडविता नीलेश लंके आमदार झाले. कोरोना संकटात राज्यात, देशात भयानक परिस्थिती होती. कोणी एकमेकांच्या जवळ जात नव्हते. अशा वेळी लंके यांनी कोरोना रूग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरू केले. हजारो रूग्णांना जीवदान दिले, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ तिसगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये थोरात हे बोलत होते. यावेळी उमेदवार नीलेश लंके यांच्यासह आ. प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, नसिर शेख, मुन्ना तांबोळी, शिवशंकर राजळे आदीउपस्थित होते. या सभेला तिसगांवकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
थोरात म्हणाले की रूग्णांजवळ बसून त्यांना धीर दिला. हे धाडस लंके हेच करू शकतात. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची ओढ त्यांच्याकडे असून एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून मोठी लोकप्रियता त्यांनी मिळविली आहे. दक्षिण नगर मतदारसंघातील तरूणांशी असलेला त्यांचा संपर्क पाहता पुढचा खासदारकीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी लंके यांचेच नाव घेतले जायचे असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
थोरात म्हणाले, की नीलेश लंके ज्यावेळी लोकसभेत जातील त्यावेळी खासदारांमध्ये कोण आहेत नीलेश लंके हे पाहण्याची उत्सुकता असेल. इतक्या मोठया धनदांडग्या उमेदवाराविरोधात कसे निवडूण आले ? किती मतांनी विजय झाला ? याचीही विचारणा होईल, त्यासाठी मताधिक्क्याचा आकडाही दोन लाखांपेक्षा अधिक हवा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

Post a Comment