नगर ः अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्या चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात इतरही उमेदवार उभे आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढलेली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदारचे भविष्य पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील मतदार ठरविणार आहे. या मतदारसंघातून जास्तीत जास्त ज्यांना मिळेल तोच उमेदवार विजयी होणार असल्याने या मतदारसंघावर सर्वांनीच लक्ष केंद्रीत केलेले आहे.
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून नेत्यांच्या बैठकांना मोठ्या प्रमाणात उधाण आलेले आहे. मागील पाच वर्षात नेते मंडळी आली त्यापेक्षा कितीतर जास्त पट आता नेते मंडळी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात येऊन बैठका घेत आहेत.
या अगोदर मात्र कधी तरी नेते मंडळी येत होती. कार्यक्रमांना हजेरी लावत होती. आणि परत माघारी जात होती. परंतु आता नेते मंडळी गावा-गावात बैठका घेऊन प्रश्न जाणून घेत आहे. मागील पाच वर्षात ही नेते मंडळी नेमकी कोठे गेली होती, असा सवाल आता मतदारसंघातील मतदारांमधून उपस्थित केला जात आहे.
पाच वर्षात जर नेते मंडळींनी चांगली कामे केली असती तर त्यांना वारंवार बैठका व सभा घेण्याची गरज पडली नसती, परंतु पाच वर्षात मतदार व स्थानिक नेत्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता नेत्यांना बैठका घेण्याची वेळ आलेली आहे. मागील पाच वर्षात पक्षाच्या निष्ठावंतांना बाजुला ठेऊन इतरांना जवळ घेऊन नेते मंडळी फिरत होती. मात्र आता मतांचा जोगवा मागण्यासाठी पक्षाचे नेते जवळ केले जात आहे.
ज्यांना पाच वर्षे बरोरबर घेऊन फिरलात त्यांनाच आता बरोबर घेऊन मताचा जोगावा नेत्यांनी मागावा, असा थेट सवाल कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. त्यामुळे नाराजांची नाराजी कशी काढली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पारनेर-नगर मतदार संघातील मतांवरच आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील खासदांचे भवितव्य अवलंबून आहे. या मतदारसंघातून जास्तीत जास्त लिड मिळावे, यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरु आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सर्वच उमदेवारांनी भेटीगाठी वाढविलेल्या आहेत.
Post a Comment