नगर ः अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. राज्यात ही निवडणूक चुरशीची हो आहे. या निवडणुकीत महायुतीने आपला उमेदवार विजयी व्हावा, यासाठी पारनेर तालुक्यातील नेत्यांची एकत्र केलेले आहे.
नेत्यांना एकत्र करताना त्यातील काहींना आमदारकीचे गाजर दाखविलेले. या आमदारकीच्या खुर्ची पायी काहींनी तनमनाने प्रचारात उडी घेतलेली आहे. काहींनी वरवर देखले पणा केलेला असून प्रत्यक्ष महायुतीच्या उमेदवाराचे कामकाज केलेले आहे. काहींनी काम केले असले तरी समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही, असे गृहीत धरून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदारकीचा आपल्या प्रमाणे इतरांनीही शब्द दिला असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे.त्यामुळे आगामी काळात महायुतीची ताकद नेमकी कोणामागे राहील, असा सवाल आता कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. परिणामी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आता फटाफूट होण्यास सुरवात झालेली आहे.
ज्यांन ज्यांना आमदारकीचा शब्द मिळालेला आहे. त्यांनी त्यांनी आता तालुक्यात जोरदार मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केलेली आहे. परंतु त्याचा त्यांना फायदा होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी नेत्यांनी दिलेल्या शब्दावर काहीजण पुढे पाऊल टाकत आहे. काहींनी शब्द मिळूनही नेत्यांच्या शब्दावर भरोसा न ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण या अगोदरही त्याच नेत्यांनी काहींना शब्द िदला होता. मात्र त्या शब्दावर त्यांनी कामकाज केलेले नाही.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून सोमवार (ता. 13) मतदान होणार आहे. प्रचाराच्या तोफा आता थंडावत असून मतदारांच्या गाठीभेटीवर भर देण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या मतदार संघातील निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी ही लढत होत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. देश पातळीपासून ते जिल्हा पातळीवरील नेत्यांनी या मतदार संघात सभा घेऊन आपलाच उमेदवार विजयी होईल, अशी घोषणा केलेली आहे.

Post a Comment