आरोग्यचा कुलूपबंद कारभार

नगर ः जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पूर्ण पणे ढेपाळलेली आहे. या आकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे आरोग्य कर्मचारी सुस्त झालेले आहे, अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. सध्या जिल्हा परिषदेच काही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा कुलूपबंद कारभार सुरु आहे.


जिल्ह्यामध्ये एकूण १५८६ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १४ तालूके असून त्या पैकी एक तालुका आदीवासी आहे. जिल्ह्यातील आदीवासी विभागात १० प्रा. आ. केंद्र, ५ प्रा. आ. पथके, व ७० उपकेंद्र आणि बिगर आदीवासी भागात ८६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, व ५५५ उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. असे एकूण जिल्हयामध्ये ५५५ उपकेंद्रे कार्यान्वीत आहेत. यातील काही प्राथमिक व काही उपकेंद्रांचा कारभार सध्या उत्कृष्ट सुरु आहे. मात्र काही केंद्रांचा कारभार मनमानी पध्दतीने सुरु आहे. 

यामध्ये नगर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्ण पणे कोलमडलेली आहे. नगर तालुक्यातील उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र बऱ्याचदा बंद असल्याचे दिसून येत आहे. याबाबत काहींनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र या तक्रारींची दखल आरोग्य विभाग घेत नसल्याचे दिसून येत आहे.  आरोग्य उपकेंद्र बंद ठेवण्यात वडगाव गुप्ता आरोग्य केंद्राची आघाडी आहे. या केंद्राबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. परंतु आरोग्य विभाग त्याकडे दु्र्लक्ष करीत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी व अधिकारी यांच्यात काही तडजोड होत असल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post