नगर : जिल्हयातील सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात कामे करणार असल्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले.
अहमदनगर एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात माहविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. निलेश लंके यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
27 व्या फेरी अखेर 37 - अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. तर सुजय विखे पाटील यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली आहेत. निलेश लंके 28 हजार 929 मतांनी विजयी झाले. निलेश लंके यांनी सुजय विखे यांना कडवी टक्कर दिली.


Post a Comment