अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा उत्तराधिकारी दक्षिणेतीलच...उत्तरेतील उमेदवाराला पाठवले उत्तरेत...

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील विरुध्द आमदार निलेश लंके अशी लढत पाहिला मिळाली. चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा दणदणीत विजय झाला आहे.

अठराव्या लोकसभेचे धक्कादायक निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून होते.


एकंदरीत ही लढत देशाचे नेते शरदचंद्र पवार आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र जिल्ह्यामध्ये दोनही मतदारसंघात महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा उत्तराधिकारी दक्षिणेतील असा सर्वांची इच्छा होती त्यानुसार माजी आमदार लंके यांना खासदार म्हणून मतदारांनी पसंती दिली आहे. यावेळी खासदार सुजय विखे यांना दक्षिणेतील मतदारांनी नाकारले आहे.

मागील पाच वर्ष खासदार सुजय विखे पाटील यांचे वर्चस्व होते. परंतु त्यांच्या पीएमुळे वर्चस्व कमी झाले होते.  खासदारापेक्षा पीएंचा तोरा मोठा होता. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह मतदार नाराज झालेले होते. या नाराजीचा फटका सुजय विखे यांना या निवडणुकीत बसलेला आहे. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post