पंकजा मुंडे यांचा पराभव राजकीय षडयंत्र.....

बीड : लोकसभा निवडणुकीत अनेक जांगावर अनपेक्षित निकाल पहायला मिळत आहे. बीडमध्येही भाजपला धक्का बसला असून पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. 


पूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची झालेली आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुतीच्या नेत्यांनी भरगच्च सभा घेऊन  त्यांना विजयी करावे असे आवाहन केले होते.  

पंकजा मुंडे विजय होतील अशी सर्वांना आशा होती. महायुतीच्या नेत्यांनीही तशी आशा होती मात्र ही आशा फोल ठरली आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव हा एक षडयंत्र असल्याची शक्यता आता कार्यकर्त्यांमध्ये चर्चिली जात आहे.  

विजय होणारे उमेदवार पराभूत झाले कसे असा सवाल कार्यकर्त्यांमधून केला जात आहेराज्य पातळीवर नेत्यांनीएकत्र येऊनराज्यातील इतर उमेदवारांना पराभूत करण्याचा डाव असल्याची राज्यभर सुरू झाली आहे. यात जिल्ह्यातील काही नेत्यांचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा 6585 मतांनी विजय झाले आहेत. पंकजा मुंडे यांना 674984 मतं मिळाली तर बजरंग सोनवणे यांना 681569 मते मिळाली आहेत.

मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे मतमोजणी केंद्र घरी गेल्या. रात्री उशिरा मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी निकालावर चर्चाही झाली. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post