नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक एकदम चुकीची झालेली आहे. या निवडणुकीतउमेदवारांनी आपले भवितव्य आजमावले होते. यामध्ये दोन जणांनाच चांगली मते मिळाली आहे. उर्वरित यांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैध मतांपेक्षा कोणत्याही उमेदवाराला १६.६६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे. परंतु तेवढी मते उमेदवारांना पडलेली नाहीत्यामुळे त्यांची हनुमंत रक्कम जप्त होणार आहे.
उमाशंकर यादव, आरती हालदार, कलीराम बहिरू, डॉ. कैलाश जाधव, रवींद्र कोठारी, दत्तात्रय वाघमोडे, दिलीप खेडकर, भागवत गायकवाड, मदन सोनवणे, भाऊसाहेब वाबळे, अॅड. शिवाजीराव डमाळे, अमोल पाचुंदकर, गोरख आळेकर, मच्छिंद्र गावडे, गंगाधर कोळेकर, अॅड. जमीर शेख, नवशाद शेख, प्रवीण दळवी, बिलाल शेख, अॅड. महेंद्र शिंदे, रावसाहेब काळे, अनिल शेकटकर, सूर्यभान लांबे यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.
.jpeg)

Post a Comment