नगर ः विजयानंतर लंके यांनी उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवित दिली प्रतिक्रिया. आता कोणाविरूद्धही काही बोलायचे नाही. मला जनतेने निवडून दिले आहे, अशी प्रतिक्रिया नीलेश लंके यांनी दिली आहे.
नगर लोकसभा मतदारसंघातील जनतेने कोणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी विविध संस्थांच्या एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांमुळे नगर दक्षिणेचे खासदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर निलेश लंके विजयी झाले.
अहमदनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके २९ हजार ३१७ मतांनी विजयी झालेले आहे. लंके यांनी आघाडी घेतल्यापासून कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली होती. तो जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरु होता.
खासदार सुजय विखे पराभूत झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. विखे यांनी विजयी होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न फोल ठरले असल्याचे दिसून आले.
मागील निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत केलेल्या हालचालींचा परिणाम या निवडणुकीत विखे यांना दिसून आला. त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Post a Comment