लग्न जुळण्याऐवजी खेळला जातो भावनांचा खेळ

नगर ः पूर्वी नात्यागोत्यातील व्यक्ती लग्न जुळविण्याचे काम केली जात होती. मात्र विभक्त कुटुंब पध्दतीने व नोकरी व्यवसायातील व्यस्त पणामुळे कोणालाच कोणाकडे जायला वेळ नाही. त्यामुळे मुला-मुलीचे लग्न जुळविण्यासाठी आता विवाह संस्थांची मदत घ्यावी लागत आहे. 


याच संधीचा आता काही विवाह संस्थांनी फायदा उठविण्यास सुरवात केलेली आहे. वधू-वराच्या पालकांकडून पैसे घेऊन विवाह जुळविण्याचे  काम केले जात आहे. मात्र विवाह या संस्था विवाह जुळण्याऐवजी ते न जुळण्यासाठीच प्रयत्न करून लूट करीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. 
 
पूर्वीच्या काळात चालता-बोलता विवाह जुळविले जात होती. ही विवाह जुळण्याची कामे घरातील वयस्क व्यक्ती तसेच काही सामाजिक कामात सक्रीय असलेले व्यक्ती करीत होते. या साठी कोणीच पैसे घेत नव्हते. फक्त एकमेकांचे नाते माहिती असणाऱ्याचे विवाह जुळविण्याचे कामे करीत होते. कालमानपरत्वे त्यात बदल झालेला आहे. 


पूर्वी सारखी आता एकत्र कुटुंब पध्दती राहिलेली नाही. त्याचे दुरगामी परिणाम आता दिसून येत आहे. लग्न झाल्यानंतर मुले लहान असल्यानंतर विभक्त कुटुंबात राहणे सर्वांनाच योग्य वाटत होते. मात्र मुले मोठे झाल्यानंतर विभक्त कुटुंब पध्दतीचे किती तोटे आहेत हे सर्वांच्याच लक्षात येत आहे. 
 
या विभक्त कुटुंब पध्दतीने एकमेकांचे नाते दुरावलेले आहेत. त्यामुळे मुलांचे लग्न जुळविताना प्रत्येक पालकाला आता अडचणी येत आहे. याच अडचणीचा आता काही संधी साधूंनी फायदा उठविण्यास सुरवात केलेली आहे. 

सुरवातीलाचा काळात या संधी सााधूंनी एक ते दोन विवाह जुळविले. त्यानंतर त्यांनी विवाह सूचक मंडळे स्थापन केली. या विवाह सूचक मंडळात सुरवातीला मोफत नावे नोॆंदून घेतली. 
 
त्यानंतर त्यांनी संधी साधू पणा सुरु केला. प्रत्येक बायोडाट्या मागे वार्षिक एक हजाराचे शुल्क आकारण्यास सुरवात केली. हे शुल्क फक्त नाव नोंदणीसाठी ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर स्थळ दाखविण्यासाठी प्रती स्थळ कमीत कमी 500 व जास्तीत जास्त पाच हजार रुपये आकारणे सुरु केेलेले आहे. 


यासाठी काहींनी कार्यालयांमध्ये कामास कर्मचारी वर्ग ठेवलेले आहे, हे कर्मचारी फोन करून माहिती देऊन वधू-वर पालकांची लूट करीत आहेत. हा प्रकार सध्या जिल्ह्यात जोमात सुरु झालेला आहे. याला अटकाव करण्याची मागणी होत आहे. 
 

जिल्ह्यासह राज्यातील काही विवाह संस्थांचा वापर काहीजण स्वतःची प्रसिध्दीसाठी करीत आहेत. या संस्थेमार्फत किती विवाह जुळले हे प्रसिध्द करीत नाहीत. मात्र या संस्थांचा प्रसिध्दीसाठी वापर करून घेत आहेत. या प्रसिध्दीतून काहीजण स्वतःचे हित साधून घेत आहे. 

काही संस्थांमध्ये लग्न जुळलेले दिसून आलेले नाही. परंतु प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येत आहे. ही प्रसिध्दी समाज माध्यमातून केली जात आहे. जिल्ह्यासह राज्यातील काही विवाह संस्थांकडून मेळावे आयोजित केले जात आहे. 
 
हे मेळावे नसून स्वतःची प्रसिध्दी मिळविण्याचे एक माध्यम बनले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विवाह सूचक मंडळाचे सर्वश्री स्वतःची प्रसिध्दी करून घेत आहे. प्रत्यक्षात या मेळाव्यांचा वधू-वरांना काहीच उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झालेले आहेत. असे मेळावे भरवून वध-वराच्या पालकांकडून पैसे लाटण्याचा उद्योग केला जात आहे.  
 
विवाह सूचक मंडळाचे संस्थापक अध्यक्षांसह पदाधिकारी आपल्याला सामाजिक काम करतो म्हणून पुरस्कार मिळत असल्याचे भासवित आहेत. मात्र प्रत्यक्षात हे सर्व पुरस्कार पैसे देऊन विकत घेतले असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
रज्या
 
विवाह सूचक मंडळातील पदाधिकाऱ्यांमधील काहींचे पुरस्कार विकतचे असून या पुरस्काच्या माध्यमातून आपण किती चांगले काम केले असल्याचे मात्र संबंधित भासवित असून पालकांची लूट करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post