लोखंडे यांच्या आरोपावर सर्वच गप्प...

 नगर ः काळे-कोल्हे, कोल्हे-विखे यांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात आपली जिरली, असे वक्तव्य माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. त्यावर अद्यापही महायुतीच्या नेत्यांनी काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे लोखंडे यांनी केलेले वक्तव्य तंतोतंत खरे आहे. त्यामुळे हा प्रश्नावर आता महायुतीच्या नेत्यांनी बैठक घेऊन यावर चर्चा करणे अपेक्षीत आहे. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे विपरीत परिणाम दिसून येण्याची दाट शक्यता आहे.



मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात जिरवा-जिरवीचे राजकारण झाले. याबाबत जिल्ह्यातील भाजपच्या आजी-माजी आमदारांनी एकत्र येत वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या. या तक्रारींवर चर्चा झाली. मात्र ठोस निर्णय झाला. त्यामुळे ही नाराजी कायम राहिली. काही नेत्यांनी वारंवार आपल्या भाषणातून उघडपणे नाराजी व्यक्त केली.

पक्षांतर्गत नाराजी असतानाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नेमके दुर्लक्ष का केले याचे कोडे अद्यापही कोणाला उलगडलेले नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नेते विधानसभा निवडणुकीतील जिरवाजिरवीचे वारंवार बोलूनही नेते गप्पच राहिले. त्यामुळे नेत्यांनी आता वरिष्ठांकडे तक्रारी न करता आगामी निवडणुकीत एकमेकांची जिरवाजिरवी करण्याचा निश्चय करून लोकसभा निवडणुकीत जिरविण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु आहे. 

या जिरवाजिरवीत मात्र पक्षाची जिरवली गेलेली आहे. त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारशे पारच्या नार्यात जिल्ह्यातील दोन जागा कमी पडलेल्या आहेत. याचे सर्वच भाजप नेत्यांनी आत्मचिंतन करावे, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. मागील विधासभा निव़डणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतचा सर्व अहवाल एकत्र करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post