मंत्री मंडळ विस्तारात राजळेंना संधी

नगर ः लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातून मोनिका राजळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 


राजळे यांनी आपल्या मतदारसंघात भरघोस विकास कामे केलेली असून पक्षाच्या उमेदवाराला आपल्या तालुक्यातून लीड देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. त्यामुळे आता पक्ष त्यांना मंत्री पदाची संधी देईल, अशी आशा सर्वांना लागली आहे.


जिल्ह्यातील शिर्डी व अहमदनगर लोकसभा निवडणूक चुरशीची झालेली आहे. महायुतीकडे या दोन्ही जागा होत्या. मात्र या दोन्ही जागा आता महाविकास आघाडीकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बिघडलेली आहेत. विशेष म्हणजे महायुतीची जिल्ह्यात चांगली ताकद असतानाही महायुतीच्या उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


जिल्ह्यात भाजप अंतर्गत गटवबाजी आहे. या गटबाजीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसलेला आहे. विशेष म्हणजे मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील गटबाजीचे अनेक किस्से नेत्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहचवलेले आहेत. मात्र वरिष्ठांनी चौकशीचे फार्स करून ठोस कारवाई केली नाही. 

त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत सर्वांनी भोगला आहे. जिल्ह्यातील सर्वत्र गटबाजी सुरु असली तरी पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात मात्र असा काहीच प्रकार झालेला नाही. 

आमदार मोनिका राजळे व त्यांच्या समर्थकांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्या एकनिष्ठेने काम केलेले आहे. त्यामुळेच या विधानसभा मतदारसंघात सुजय विखे यांना काही प्रमाणात लीड भेटलेले आहे. सुजय विखे यांना लीड या मतदारसंघातून मिळू नये, यासाठी विरोधकांनी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रयत्नांवर आमदार मोनिका राजळे यांनी पाणी फेरले आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासूनच राजळे यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन खासदार सुजय विखे यांना निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच विखे यांना या मतदारसंघात लीड भेटलेले आहे. 

मात्र इतर मतदारसंघात त्यांना लीड न भेटल्याने विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  परंतु राजळे यांनी विखे यांचे उत्कृष्टपणे काम केलेले असून पक्षाची एकनिष्ठपणा ठेवलेला आहे. 

या त्यांच्या कामाची दखल घेऊन आता पक्ष त्यांना आगामी काही दिवसांसाठी मंत्रीपदाची संधी देणार असल्याची चर्चा सध्या सुरु झालेली आहे. या चर्चेला आता भाजपच्या नेत्यांनी मंत्रीपद देऊन पूर्णविराम द्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. 

याबाबत काही कार्यकर्त्यांनी आता पक्षाच्या नेत्यांना भेटण्याच्या हालचाली सुुरु झालेल्या आहेत. वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मतदारसंघात किती कामे केलेो आहेत. कोणती प्रलंबित आहे, याची माहिती घेऊ ती प्रसिध्दीला दिली जात
आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post