अजित पवार यांना रोहित पवार यांचा टोला...

बारामती ः बारामतीत सुप्रिया सुळे या एक लाख मताने विजयी झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झालेली आहे.   दरम्यान, वरून आता रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. 


बच्चा बडा हो गया काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झाली आहे. पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही, तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेले त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झाली आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय हा शरद पवार यांच्या विचारांचा, सुप्रिया सुळे यांच्या कष्टाचा, मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रिया सुळे मनापासून अभिनंदन, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post