शिर्डी ः शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला आहे.
शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात विजयी घोषित करण्यात आले आहेत. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक ज्येष्ठ सनदी अधिकारी अजय कुमार बिष्ट हे उपस्थित होते.
या ्अगोदर याच मतदारसंघातून वाकचौरे विजयी झाले होते. मात्र त्यांनी पक्ष बदल केल्यामुळे ते पराभूत झाले होते. पुन्हा त्यांनी उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे ते विजयी झाले. दरम्यान, वाकचौरे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर सर्वच कार्यकर्ते कामाला लागले. त्याचाच परिणाम आज विजयात दिसून येत आहे.

Post a Comment