नगर ः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार सध्या जिल्ह्यात चर्चेला विषय बनलेला आहे. या विभागातील काही फाईल वारंवार नामंजूर होत आहे. मात्र काही फाईल तातडीने मंजूर होत आहे. मंजूर होणाऱ्या फाईल वजनदार असतात, अशीच चर्चा सध्या शिक्षण विभागात सुरु आहे.
जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज आहे. या प्रशासक राज कार्यकाळात अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरु आहे. या कारभाराला सध्या सर्वसामान्य कंटाळलेले आहेत. शिक्षण विभागातील कारभाराबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. मात्र या तक्रारींची दखलच प्रशासन घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांचा मनमानी पध्दतीने कारभार सुरु आहे. काही संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील काही खास व्यक्तींना हाताशी धरलेले आहेत. त्यामुळे त्या संस्थांच्या फाईल तत्काळ मंजूर होत आहे. काही संस्थांच्या फाईल नियमात असूनही त्या अडविल्या जात आहे.
हा प्रकार गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची चर्चा जिल्ह्यातील शाळांमध्ये सुरु आहे. ही बाबत काहींनी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले असल्याची चर्चा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये लिपांमध्ये सुरु आहे.
कायदेशीबाबी न तपासता मंजुरीजिल्ह्यातील काही मुख्याध्यापक सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानंतर त्यांच्या जागी दुसऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. ही संधी देताना प्रत्येक शाळेकडून येणाऱ्या प्रस्तांवाची पडताळणी न करताच शिक्षण विभाग मंजुरी देत आहे. काही शाळांचे प्रस्ताव येऊनही त्यांना मंजुरी दिली जात नसल्याचे चर्चा आहे. यामध्ये वजनदार फाईलला महत्व दिले जात असल्याची चर्चा शिक्षण विभागातून सुरु झालेली असून जिल्हाभर सुरु आहे.
Post a Comment