नगर : श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीने अनुराधा नागवडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळेही जागा नागवडे यांच्यासाठी सोडावी अशी मागणी होत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वांनी आता एकमेकांच्या जागांवर दावे करण्यास सुरुवात केली आहे. सुगंधा विधानसभा मतदारसंघातून ही अनेकांनी आपल्याच उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
या मतदारसंघात सध्या विद्यमान भाजपाचे आमदार आहेत. परंतु या मतदारसंघात आता पवार गटाची ताकद वाढलेली दिसून येत आहे. ही जागा आता अजित पवार गटाला मिळावी अशी मागणी होत आहे.
यासाठी श्रीगोंदा येथील अजित पवार गटाचे कार्यकर्ते आता वरिष्ठ नेत्यांची भेटी घेऊन या संदर्भात मागणी करणार आहेत. ही जागा महायुतीला आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर ही जागा नागवडे यांच्यासाठी भाजपने सोडावी अशी मागणी होत आहे.
.jpeg)
Post a Comment