विसर्जन मिरवणुकीत हत्यारे जप्त...

नगर : गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्यांखाली लपवून ठेवलेले  शस्त्र तोफखाना पोलिसांनी जप्त केले आहे. यामुळे येथील अनुचित घटना टळली आहे. १७ सप्टेंबर रोजी अहमदनगर शहर व उपनगरामध्ये मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात देखील आलेला होता.


तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे हे स्वत:तसेच तोफखाना पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने शहरातील तसेच तोफखाना पोलिस स्टेशन हद्द असलेल्या उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. 

तसेच चोख पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपनगर भागात असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेले असतानाच सायंकाळच्या सुमारास तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. 

त्यानंतर उपनगराचाराजा गणेश मित्र मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये गुलालाचे गोण्याचे खालील तलवार व काही घातक शस्त्रे काहीतरी घातपात करण्याचे उद्देशाने गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी लपवून ठेवलेली आहे. 

सदर बातमी मिळताच पोलिस निरीक्षक स्वत: तात्काळ सोनानगर चौकात हजर होवून तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह बातमी मिळाले प्रमाणे उपनगरराजा मित्र मंडळाचे गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीची पंचाचे समक्ष झडती घेतली.  

ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता, तीन लोखंडी पाईप,एक कटावनी व एक लोखंडी पाईपला सायकलचा गियर लावून केलेले घातक शस्त्रासह एक बेस बॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गोणीमध्ये लपवून ठेवले असल्याचे मिळून आल्याने सदरचे हत्यारे पोलिसांनी  जप्त केली. 


पो.हे.कॉ.रणजित अजिनाथ बारगजे यांनी उपनगरचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/दत्तात्रय जपे हे करत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post