नगर : राजकारणात शब्द प्रत्येकालाच दिला जातो. तो पाळला जातो असे नाही कधी कधी शब्द फिरवला जातो. किंवा शब्द देऊनही विसर पडल्याचे दाखविले जात आहे. मात्र श्रीगोंदे- नगर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी आपलया पक्षातील इच्छूक उमेदवाराला शब्द दिला आहे.
या शब्दानेच सध्या श्रीगोंदे -नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप झाला आहे. या महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात संघर्ष सुरु आला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांना श्रीगोंदे- नगर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीचा शब्द दिलेला आहे. याच मतदार संघातून महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या गटाने माजी आमदार राहुल जगताप यांना उमेदवरीचा शब्द दिला आहे. या शब्दाने राऊत यांनी पाचपुते यांना दिलेल्या शब्दाचे काय होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार हा साजन सदाशिव पाचपुते हाच असेल. असे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
.jpeg)
Post a Comment