उच्चशिक्षित प्राथ शिक्षक एम एड कृती समितीच्या प्रश्नांसंदर्भात भारत सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांना साकडे....

नगर : महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम एड प्राथ शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री ना .मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसह इतर प्रलंबित प्रश्नांबाबत यशस्वी चर्चा केल्याची माहिती राज्य कृती समितीचे संस्थापक राज्याध्यक्ष  राजू जाधव , राज्य उपाध्यक्ष राजेंद्र निमसे  व राज्य कार्यवाह जनार्धन बोटकर यांनी दिली.


महाराष्ट्र राज्यातील उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात उच्चशिक्षित कृती समिती च्या वतीने  केंद्रीय राज्यमंत्री यांची त्यांच्या पुणे येथील  कार्यालयात भेट घेऊन त्यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला व उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. 

महाराष्ट्र राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठी असून पूर्वी प्राथमिक शिक्षक म्हणून एस एस सी डी एड ही पात्रता होती आणि इयत्ता सहावी ते आठवीला एकच पदवीधर म्हणून बी ए बी .एड शिक्षित असणारा नेमला जात होता.

पूर्वी फार कमी प्रमाणात प्राथमिक शिक्षक हे उच्च पात्रता धारक होते. परंतु सध्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामुळे व बदललेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक धोरणांमूळे बहुतांश शिक्षकांनी आपली शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता वाढवलेली आहे . नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(NEP) २०२० मधील तरतुदीनुसार  सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार केंद्र सरकारने NEP 2020 चा आराखडा तयार केलेला असून त्यामध्ये राज्याच्या आराखड्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उच्चशिक्षित प्राथ शिक्षकांना नवीन पदोन्नतीच्या संधी निर्माण करण्यासंदर्भात जी परिशिष्टे आहेत. 

त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी सेवाशर्ती अधिनियम १९६७ मध्ये तातडीने बदल करून कार्यरत व अनुभवी उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती च्या संधी निर्माण करण्यासंदर्भात अथवा तात्पुरत्या स्वरूपात उच्च  पदे निर्माण होतील का या विषयी केंद्रीय सूची मध्ये बदल करून राज्य सरकारला निर्देश देण्यासंदर्भात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. 

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर लवकरच आपल्या संघटनेच्या सर्व जिल्हाध्यक्षांसमवेत मुंबई येथे  एकत्रित बैठक लावण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे निश्चित आश्वासन देऊन त्यांनी केंद्रीय शिक्षण विभागाकडून निश्चितच सहकार्याची भूमिका असणार असल्याचे मत व्यक्त केले. 

उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांनी राज्यस्तरावर एकत्र येऊन शैक्षणिक सार्वत्रिकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्या .

यावेळी या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षक कृती समितीचे संस्थापक राज्याध्यक्ष राजू जाधव ( पुणे ) , राज्य उपाध्यक्ष राजेंद्र निमसे ( अहमदनगर )  , राज्यकार्यवाह जनार्दन बोटकर  , राज्य चिटणीस देवीप्रसाद तावरे (पुणे ),आदी उपस्थित होते.

या भेटीबद्दल महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम एड कृती समितीचे  सर्वश्री राज्य कोषाध्यक्ष तेजराव देशमुख (बुलढाणा),महिला राज्य संपर्कप्रमुख नसरीन सय्यद   ( औरंगाबाद), राज्य प्रसिद्धीप्रमुख सूर्यकांत तडस (सातारा ), राज्य उपाध्यक्ष मनोज देशमुख (सोलापूर ), धन्यकुमार तारळकर ( सातारा ), वसंत वाडीले (औरंगाबाद ), विश्वनाथ काशीद ( सांगली ) ,प्रेम राठोड  (यवतमाळ ) , सुभाष भोई  (रायगड ) , रावसाहेब पगार  (नाशिक ) , प्रकाश भामरे  (नाशिक ) , शिवाजीराव डोंगरदिवे ( अमरावती ) , संतोष भुवड ( रत्नागिरी ) , कीर्ती पालटकर  (नागपूर ) , मोहिनी बागुल  ,पूजा धुरी  (रत्नागिरी) ,पुणे जिल्हाध्यक्ष शहाजी मेत्रे , सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक पवार , सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी माने , सांगली जिल्हाध्यक्ष विजय देठे , अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद भालेकर  ,ठाणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वेखंडे  ,पालघर जिल्हाध्यक्ष संदीप पाटील  , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कैलास केळकर , वाशिम जिल्हाध्यक्ष अजय चव्हाण  ,जालना जिल्हाध्यक्ष अभिषेक बंगाळे  ,जळगाव जिल्हाध्यक्ष संजीव सपकाळ , औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पवार  , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्वला क्षीरसागर , हिंगोली जिल्हाध्यक्ष मुरलीधर दवसे , बुलढाणा जिल्हाध्यक्ष रमेश यंगड , अकोला जिल्हा प्रमुख राजेश राजूरकर , रायगड जिल्हाध्यक्ष कमलेश धुळगुंडे , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के पाटील , लातूर जिल्हाध्यक्ष सचिन मुर्के , नांदेड जिल्हाध्यक्ष नागेश कैमरकोंडा  ,परभणी जिल्हाध्यक्ष हनुमंत मुसळे  ,हिंगोली जिल्हाध्यक्ष मुरलीधर दवसे , नागपूर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर आकर्ते ,नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र खैरनार  या पदाधिकाऱ्यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.

लवकरच संस्थापक राज्याध्यक्ष  राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर विभागानुसार संघटनात्मक वाढीसाठी दौरा आयोजित केला जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post