नगर : जिल्हा परिषदेतील महिला कर्मचार्यांनी एकत्र येत प्रथमच मंडळ स्थापन करून गणेशोत्सव साजरा केला. महिला कर्मचार्यांसह सर्वांच्या उपस्थितीत श्रींना निरोप देण्यात आला. या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिला कर्मचार्यांची संख्या अधिक होती. या विसर्जन मिरवणुकीत महिला कर्मचार्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. अनेकांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
जिल्हा परिषदेत दरवर्षीच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु यंदाच्या वर्षी गणोशोत्सव साजरा करण्याचा निर्णय महिलांनी घेत गणेश मंडळाची स्थापना केली. महिलांनी एकत्र येवून गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
गणेशोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी रजनी जाधव यांची निवड करण्यात आली. जाधव यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले. दररोज जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांना आरतीचा मान देण्यात आला. विभाग प्रमुखांनी पत्नीसह येऊन जिल्हा परिषदेत आरती केली. प्रथम हा उपक्रम राबविल्याने सर्वांमध्ये उत्साह दिसून येत होता.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रजनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोनाली चेडे, रेश्मा नागपुरे, विजया गायकवाड, अर्चना रासकर, कल्पना शिंदे, भारती जाधव, आरती जाधव आदी महिला कर्मचार्यांनी कार्यक्रमांचे नियोजन केले.
गणेशोत्सवाबरोबरच गणेश विसर्जन मिरवणुकीचेही नियोजन महिला मंडळाने केले. या विसर्जन मिरवणुकीत सर्व महिला कर्मचार्यांनी फेटे परिधान केलेले होते. सर्व महिला कर्मचारी या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
या विसर्जन मिरवणुकीत ढोलपथकाचा समावेश होता. महिला व मुली असलेले हे पथक होते. या पथकात जिल्हा परिषदेतील महिला कर्मचार्यांचा सहभाग घेत ढोल वाजविण्याचा आनंद लुटला. त्यामुळे ही मिरवणूक लढवेधी ठरली होती.
महिला कर्मचार्यांनी या मिरवणुकीत सहभागी होत गणेशाला निरोप दिला. या मिरवणुकीत महिलांनी फुगड्याचा आनंद लुटला.
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यादाच महिलांनी कर्मचार्यांनी एकत्र गणेशोत्सव साजरा केला आहे. हा उत्सव उत्साहात साजरा झाल्याने महिला कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
गणोशोत्सवात महिलांनी एकत्र येऊन साजरा केला. या उत्सवात महिला कर्मचार्यांनी एकत्र येत महाप्रसादाचे नियोजन केले. या महाप्रसाद प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्यापत्नी तसेच इतर अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. महाप्रसाद वाट प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या पत्नीने कर्मचार्यांना जेवण वाढण्याचे काम केले.
जिल्हा परिषदेत महिला कर्मचारी एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करीत आहे हे कौतुकास्पद आहे. उत्सव साजरा करताना तसेच लाडक्या गणरायाची सेवा करताना दैनंदिन कामकाजातील ताणतणाव दूर होतात. प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा मिळते. -आशिष येरेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर








Post a Comment