पाथर्डी : मोहटे येथे मोहटादेवी शारदीय नवरात्र महोत्सव २०२४ ला गुरूवार तीन ऑक्टोबर (घटस्थापना) पासून सुरवात होत आहे. हा महोत्सव १६ ऑक्टोबर २०२४ (कोजागरी पौर्णिमा) या कालावधीत संपन्न होत आहे.
घटस्थापना तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकर वजता होणार आहे. होमहवन व पूर्णाहुती ११ ऑक्टोबर २०२४ सकाळी . आठ ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान होणार आहे.
कावडीचे पाणी व काल्याचे कीर्तन १२ ऑक्टोबर २०२४ मोहटादेवी यात्रा, पालखी सोहळा छबिना १३ ऑक्टोबर रोजी तसेच, हजेऱ्या व हगामा १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोजागरी पौर्णिमा १६ ऑक्टोबर २०२४ साजरी होणार आहे.
शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. भाविक भक्तांनी देवी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
.jpeg)
Post a Comment