हातबाँंम्ब आढळल्याने खळबळ...

नगर :  नारायणगाव डोह (ता. नगर) या ठिकाणी बाळासाहेब फुंदे यांच्या घरासमोर जुन्या काळातील बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली आहे. या संदर्भातली माहिती ग्रामस्थांनी तत्काळ नगर पोलिसांना आणि लष्कराला दिली असून पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 


नगर जिल्हा हा लष्कराचे ठाण आहे. या ठिकाणी याआधीही अशाप्रकारच्या वस्तू आढळून आल्या आहेत. पूर्वी युद्धामध्ये किंवा सराव करताना जे काही दारू गोळे असायचे. हा त्यातीलच भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता आढळलेला हातबॉम्ब सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधाही चार वेळेला नारायण डोह या परिसरामध्ये हातबॉम्ब सापडले होते.

नारायण डोह परिसरामध्ये पाचमन वस्तीजवळ बाळासाहेब फुंदे यांच्या घरासमोर हातबॉम्ब सापडला असून साधारणता त्याचे वजन दोन ते तीन किलो असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी ग्रामस्थांनी ही माहिती तत्काळ नगर तालुका पोलिसांना व लष्कराला कळवली असून दुपारी हे पथक घटनास्थळी दाखल झाले.

हा बाँम्ब आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लष्कराने हा बॉम्ब ताब्यात घेतला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post