युवराजला पसंती नसतानाही प्रसिध्दीचा फंडा चव्हाट्यावर

नगर : युवराजला कार्यकर्त्यांसह मतदारांमधून नापसंत केले जात आहे. मात्र युवराजने प्रसिध्दीचा फंडा वापरून आपल्याला सर्वाधिक पसंती असल्याचे भासविले आहे. या प्रसिध्दीच्या स्टंटची पोलखोल सोशल मीडियावर झाली आहे.  त्यामुळे युवरजला आगामी काळात उमेदवारी  मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. 


युवा नेत्याच्या नावाला मतदारसंघातील बहुतांशी मतदारांनी नापसंत या अगोदर केलेले असून आताही 'युवराज' तुम्ही थांबा, असे मत कार्यकर्ते नोंदवत आहेत. विशेष म्हणजे बहुतांशी मतदारांनी मतदारसंघात बदल करण्याचे संकेत देत महिला नेत्यांना पसंती दिली जाणार आहे.  यामुळे 'त्या' युवा नेत्यांची मोठी अडचण झाली आहे.

आमदार म्हणून विधानसभा निवडणुकीत आमदाराच्या पुत्राच्या नावाला मात्र सर्व्हेत ब्रेक लालेला दिसून येत आहे. तरीही हा नेता अंधारातून तिर मारत बसला आहे. आपल्या नावाचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न या युवराजाने सुरु केला आहे. 

दहा वर्षांपूर्वीही युवराजला एका बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तीने तुम्हाला सर्वाधिक पसंती असल्याचे खोटे सांगून लोकसभेसाठी घोड्यावर बसविले होते.त्या व्यक्तीने त्यावेळी आपल्या संस्थेच्या हितासाठी तसे केले होते.  

आताही युवराजला एका बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तीने राजकीय माहिती नसताना तोडक्या माहितीवर युवराजला सर्वाधिक पाठबळ असल्याचे भासविले आहे, अशी चर्चा सध्या युवराजचा मतदार संघात सुरु आहे. 

युवराला हा सल्ला ओली पार्टीसह कोरडा शिधा देऊन दिल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सर्वाधिक सुरु आहे. ही बाबआता अनेकांनी युवराजला समजून सांगितली असून त्यांच्याही हे लक्षात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post